पारोळा (प्रतिनिधी) – भीम आर्मी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विर क्रांतियोद्धा, संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद यांच्या ३ डिसेंम्बर जन्मदिनाच्या निमित्ताने “भिम आर्मी” पारोळा टीमतर्फे पारोळा कुटीर रुग्णालय येथील रुग्णांना आणि कर्मचारी बांधवाना फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश साळुंखे, भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र वानखेडे यांच्यासह प्रताप पाटील, मनोहर संदानशिव, अँड. स्वाती शिंदे, भाऊसाहेब सोनवणे, राजू वानखेडे आणि कर्मचारी उपस्थित होते.