पारोळा (प्रतिनिधी) – जागतिक अपंग दिवस निमित्ताने आज ३ डिसेंबर रोजी संयुक्त दिव्यांग मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन जि. प. शाळा क्र. १ पारोळा येथे सकाळीं ११ वाजता करण्यात आले.
सदर कार्यक्रमास आ. चिमणराव पाटील अधयक्षस्थानी होते. आमदार दिव्यांगाच्या प्रश्नांची दखल घेतली. तालुका स्तरावर सर्व दिव्यांगांची यादी अद्यावत करणे, अपंगांसाठी स्वावलंबन कार्ड व अपंग प्रमाणपत्र मेळावा तालुकास्तरीय झाला पाहिजे. सर्व दिव्यांगांना पिवळे कार्ड मिळावे व अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा. ज्या दिव्यांग संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित आहेत त्यांना त्वरित मिळावा. न. पा. व ग्रामपंचायत मार्फत राखीव निधीतून मिळणारा निधी दिव्यांगांना मिळावा, तसेच घरकुल योजनेचा लाभ, स्वयंरोगारासाठी आर्थिक साहाय्य, न. पा. व ग्रामपंचायत मार्फत व्यवसायासाठी ३% गाले किंवा जागा मिळावी,दिव्यांगासाठी इतर केंद्र व राज्य सरकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात.अशा आशयाचे निवेदन दीव्यांग सेनेमार्फत देण्यात आले.सदर कार्यक्रमास पारोळाचे प्रभारी गटविकास अधिकारी शुभम गुप्ता, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हा सचिव अपंग कर्मचारी संघटना सुरेश राजपूत, देवरे, बडगुजर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास तालुक्यातून मोठ्या संख्येने दिव्यंग कोविड १९ चे पालन करून उपस्थित होते. सदर कार्यक्रम याशवितेसाठी डिव्यांग सेनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत आनंद पाटील, मूकबधिर तालुकाध्यक्ष शिवाजी माळी, तालुका प्रसिद्धी प्रमुख सुरेश दोधू भोई, दीपक कुंभार, कैलास लोहार, विजय महाजन, ज्ञानेश्वर पाटील जितेंद्र पाटील आदी सदस्यांनी मेहनत घेतली.