जळगाव (प्रतिनिधी) – नोव्हेंबर, २०२० मघ्ये घेण्यात आलेल्या सहायक प्राध्यापकपदासाठीच्या युजीसी नेट परीक्षेत इंजि. राजेश इच्छाराम पाटील यांनी यश संपादन केले.
सहायक प्राध्यापकपदासाठी घेण्यात आलेल्या युजीसी नेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यापीठ उपअभियंता राजेश इच्छाराम पाटील यांनी योग या विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच राजेश पाटील हे यौगिक सायन्स या विषयात एम.ए. मध्ये विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशा बद्दल कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहूलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी अभिनंदन केले आहे.