धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मुसळी येथील ५० वर्षीय व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पांडूरंग पुंडलिक जाधव (वय-५० रा. मुसळी पो. वराड ता. धरणगाव ) हे कुटुंबियासह वास्तव्याला होते. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावाबाहेर खळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी दसुरे यांनी मयत घोषीत केले. धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश भालेराव करीत आहेत.