पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील आडगाव शिवारातील शेतातील ३ लाख रुपये किमतीचा कापूस जळून खाक झाला पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
प्रविण गुलाबराव पाटील (वय-३० रा. आडगाव ता.पारोळा ) यांचे आडगाव शिवारातील गट क्रमांक ४७ मध्ये शेत आहे. शेतात झोपडी झोपडीमध्ये त्यांनी ३० क्विंटल कापूस भरून ठेवला होता. १ एप्रिलरोजी रात्री अचानक झोपडीला आग लागल्याने आगीत जवळपास २५ क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. यामध्ये ३ लाख रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. पारोळा पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो हे कॉ सुधीर चौधरी करीत आहेत