औरंगाबाद ( प्रतिनिधी ) – राज ठाकरेंवर बोलू नका असा असदुद्दीन ओवेसीनी फतवा काढला आहे. एमआयएम कार्यकर्त्यांना कोणत्याही गोष्टीवर बोलायचं नाही असं ठणकावून सांगण्यात आलं आहे अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली
काल राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे उतरावे लागतील, माझा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागलेले असतील. त्या मशिदीसमोर भोंग्यांच्या समोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावा असं वक्तव्य केलं राज ठाकरेंच्या भाषणावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील टीका केली
मशिदींतील लाऊडस्पीकरबाबत सरकार काही निर्णय घेणार नसेल, तर मशिदींसमोर दुहेरी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचा जप करू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील मशिदी आणि मदरसांची पोलिसांनी नीट तपासणी केल्यास त्यांना अनेक गोष्टी कळतील, असेही ते म्हणाले. त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणची बदलती लोकसंख्या अधोरेखित केली आणि पाकिस्तान आणि बांगलादेशातून अनेक मुस्लिम येथे येऊन स्थायिक झाल्याचा आरोप केला.