नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरातील पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्या सुटकेची मागणी केली आहे. काश्मीरचा कलम 370 अन्वये देण्यात आलेला विषेश राज्याचा दर्जा गेल्या वर्षी काढून घेण्यात आल्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.

त्यांची अजून सुटका करण्यात आली नाही. त्याबद्दल आपल्या ट्विटर अकौंटवरून नाराजी व्यक्त करताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की. सरकार जेव्हा राजकीय नेत्यांना बेकायदेशीरपणे डांबुन ठेवते त्यावेळी लोकशाहीचे मोठे नुकसान होत असते. त्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांना त्वरीत मुक्त करण्याची वेळ आली आहे असे त्यांनी म्हटले आहे.







