जळगाव (प्रतिनिधी) – बीएचआर पतसंस्थेबाबत आपल्याकडे कागदपत्रे आणि इतर माहिती असून लवकरच पत्रकारांसमोर माहिती आणेल अशी माहिती माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
प्रकरणात जिल्ह्यातील दिग्गजच अधिक अडकले असून संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री याची पण माहिती उघड होईल. त्याबाबत लवकरच माहिती देणार असल्याचे खडसेंनी सांगितले.
बीएचआर संस्थेतील अपहार, गुंतवणूकदारांची देणी न देणे, संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री करणे व पुणे येथे दाखल गुन्ह्या संदर्भात जळगावात आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. यासंदर्भात खडसे यांनी राज्य सरकारकडे २०१८ पासूनच तक्रारी केल्या आहे. सोबतच खासदार रक्षा खडसे यांनी दिल्ली येथे व अँड. कीर्ती पाटील यांनीदेखील तक्रारी केल्याची माहिती मिळाली.