पाचोरा (प्रतिनिधी) – बाजार समितीच्या भडगाव मार्केट यार्डात प्रथमच कांदा खरेदीचा शुभारंभ आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करून शुभारंभ करण्यात आला. भडगावलगत असलेल्या पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल परिसरातील कांदा उत्पादकांना योग्य बाजारपेठ मिळावी या उद्देशाने पाचोरा बाजार समितीचे प्रशासक नामदेव सूर्यवंशी व सचिव बी.बी.बोरुडे यांनी योग्य ते परवानगी घेउन कांदा मार्केट सुरू करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी संतोष धनगर गिरड, भगवान पाटील निंभोरा, संदीप पाटील टिटवी यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणला होता. या शेतकऱ्यांचा आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संदीप पाटील यांच्या कांद्याला लिलावामध्ये नाशिक विभागात सर्वात जास्त ३८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. आता पाचोरा भडगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भडगाव यार्डात बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता कांदा शेतीमालाचा जाहीर लिलाव होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव बी.बी. बोरुडे यांनी दिली.
कांदा खरेदीच्या शुभारंभप्रसंगी विकास पाटील, संजय श्रावण पाटील, गणेश परदेशी, संजय सिसोदिया, शशिकांत येवले, विलास पाटील, जगन भोई, जे.के.पाटील, सुखदेव पाटील, सचिन येवले, राजेंद्र बडगुजर, भारत पाटील, नईम शेख, यासिन बागवान, प्रकाश केसवणी, बाजार समितीचे अधिकारी एन.टी.पाटील, उपसचिव पी.एस. देवरे, एच.आर.देशमुख, बी.जे.गुजर, पी.आर.ब्राह्मणे, व्ही.जे.महाजन उपस्थित होते.