जळगाव ( प्रतिनिधी ) – आरोग्य विभाग , जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांचे दिर्घकालावधीपासून प्रलंबित प्रश्न आणि पदोन्नत्यांचे प्रस्ताव मार्गी लावल्याबद्दल काष्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत
आरोग्य कर्मचाऱ्यांचे दिर्घकालावधीपासून प्रलंबित कालबद्ध पदोन्नतीचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी मार्गी लावले सर्व प्रस्ताव एकाचवेळी मार्गी लागावेत यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करून सुट्टीच्या दिवशीसुद्धा कार्यालय सुरू ठेऊन सर्व प्रस्तावना समितीसमक्ष ठेवून मान्यता दिली याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे पवार यांनाही संघटनेतर्फे धन्यवाद. दिले आहेत
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार , डॉ प्रमोद पांढरे यांच्यासह चौधरी , कुरकुरे , विलास बोडे , डी एन माळी , प्रवीण सोनवणे , तागवले साहेब, खाचने , मनोहर बावणे,, ,दिनेश , झोपे ,, ,जितेंद्र सोनवणे ,, ,बागुल ,, ,आत्रे ,, ,हेमंत पाटील ,, ,अनिता पाटील ,, ,साकीब , पठाण आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शतशः धन्यवाद.दिले आहेत
बहुविध कर्मचारी संघटनेचे संस्थापक सापकडे , काष्ट्राईब कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आर एस अडकमोल , काष्ट्राईब संघटनेचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरळकर , मार्गदर्शक अजय चौधरी , सुनील निकम यांनी या निर्णयांसाठी पाठपुरावा केला होता
काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संघटनेचे अध्यक्ष संजय ठाकूर , राजेश कुमावत, विजय देशमुख, जयंत पाटील, प्रशांत पाटील , , महेंद्र वानखेडे , मिलिंद लोणारी आदींनी त्यांना सहकार्य केले .