जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील सुरत-रेल्वे गेटजवळ उभ्या ट्रकला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, मुळ जामनेर तालुक्यातील सारवा येथील सुनील नारायण शिंदे ( वय ५० ) हा सध्यस्थितित जळगाव शहरातील वाघनगर परिसरातील कोल्हे हिल्स येथे राहतो. रविवारी २७ मार्च रोजी दुपारी सुनील शिंदे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी घेऊन कोल्हे हिल्स परिसरात भरधाव वेगाने दुचाकी चालवत होते. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा दिला असता ते थांबले नाहीत. त्यानंतर शहरातील निवृत्तीनगर, मुक्ताईनगर या भागात भरधाव भरधाव वेगाने दुचाकी चालवत असतांना त्यांची दुचाकी सुरत रेल्वे गेटजवळ उभ्या ट्रकवर धडकली. या घटनेत दुचाकीस्वार सुनील शिंदे यांच्या तोंडावर हातावर जखमी झाले.