जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील गढोदा येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. जितेंद्र गोपाल सपकाळे ( वय 35 ) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
जितेंद्र सपकाळे हा आई, पत्नी, भाऊ, वहिनी यांच्यासह वास्तव्याला आहे. बँड पथकात वाजंत्रीचे काम करून उदरनिर्वाह करतो. त्याची आई दुर्धर आजाराने ग्रासलेली असल्याने उपचारासाठी भाऊ सिद्धार्थ आणि बहीण यांनी महिन्याभरापासून पुण्यात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे जितेंद्र घरी एकटाच होता. २८ जूनरोजी दुपारी गल्लीतील काही मुलांसोबत जितेंद्र सपकाळे बसलेला होता. त्यानंतर घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सायंकाळी मुलांच्या लक्षात आला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी जितेंद्र सपकाळे मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पो हे कॉ अनिल फेगडे करीत आहे. जितेंद्रच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, वहिनी आणि एक बहीण असा परिवार आहे.