जळगाव ( प्रतिनिधी ) – पिंप्राळा परिसरातील माधवनगरमध्ये नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
माधवनगर कॉलनीला लागून असलेल्या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह एका बिल्डरने स्वतः च्या फायद्यासाठी बदलल्यामुळे हे पाणी माधवनगरमध्ये शिरले. रात्री नाल्याच्या पाण्यामध्ये साप वाहून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कॉलनीमध्ये सर्वत्र पाणी साचल्यामुळे रहिवाशांना घराच्या बाहेर निघणे देखील कठीण झाले होते. त्यामुळे नागरिकांकडून महानगरपालिका प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून महानगरपालिका प्रशासनाने संबंधित बिल्डरला तातडीने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह जैसे थे करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.