जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गोलाणी मार्केट परिसरात असणाऱ्या अग्नीशमन कार्यालया जवळून तरूणाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अजय प्रदीप चांदेलकर (वय-२७) रा.शिवाजी नगर, जळगाव हा तरूण खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता अजय हा त्याची दुचाकी (एकएच १९ सीएम ५८८९) ने गोलाणी मार्केटमधील अग्नीशमन विभागाच्या कार्यालयाजवळ आला होता. दुचाकी कार्यालयासमोरील पार्किंगच्या जागेवर लावली होती. अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास समोर आले. अजयने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.