यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील आडगाव येथील एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील आडगाव जवळील रोडवर १७ वर्षीय मुलगी ही शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शौचावरून परत घरी येत असताना संशयित आरोपी जावेद समशेर तडवी रा. आडगाव, ता.यावल यांनी तिचा पाठलाग करून तिचा हात पकडला. तू माझ्या घरी जेवायला चल असे म्हणून तिला अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला आहे. या संदर्भात अल्पवयीन मुलीने हा प्रकार आपल्याला नातेवाईकांना सांगितल्यानंतर पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी जावेद समशेर तडवी याच्या विरोधात यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.