पुणे (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली. तसेच, पुण्यात कोरोना बाधितांची संख्या अधिक वाढू लागली. तेव्हापासून उपमुख्यंमत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यामध्ये दर शुक्रवारी कोरोनाबाबत आढावा बैठक घेत असतात. पुण्यातील प्रशासकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुण्यातील अनेक समस्या, माहिती जाणून घेत असतात. मात्र, आजच्या आढावा बैठकीत खुद्द अजित पवारच उपस्थित नसल्याने बैठकीत चर्चा रंगल्या होत्या, मात्र अजित पवार का उपस्थित राहिले नाहीत. याबाबत कारण आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे. यावरून चर्चा थंडावल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी GST बाबत बैठकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात होते. ही बैठक लांबल्याने अजित पवार हे विभागीय आयुक्त कार्यालयातील कोरोना आढावा बैठकीला आले नाहीत असं सांगितलं जात आहे. यामुळे पुण्यामध्ये अचानक आलेले राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही बैठक पार पाडली आहे.
या दरम्यान, दर आठ्वड्यानुसार आज सुद्धा या बैठकीचे नियोजन केले होते. सकाळच्या दरम्यान GST संदर्भात असलेल्या बैठकीला हजेरी लावून अजित पवार हे २ वाजता कोरोना आढावा बैठक घेणार होते. त्यापाठोपाठ वारी बाबत देखील चर्चा करण्यासाठी बैठकीचे नियोजन केले होते. परंतु, अजित पवार हे पुण्यात असुनही या बैठकीला उपस्थित नव्हते. यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही बैठक घेतली आहे.







