• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पेपर मिलला लागलेली आग आटोक्याबाहेर, अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरूच

जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुनसगाव येथील पेपर मीलला रविवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता भीषण अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संध्याकाळपर्यंत एकूण २५ ते ३० आगीचे बंब लागले आहेत.

सुनसगाव शिवारातील गट नं. १०८ मध्ये राजेंद्र चौधरी यांच्या मालकीची सुदर्शन पेपर मिल आहे. या ठिकाणी ड्युप्लेक्स नावाच्या इम्पोर्टेट पेपरची निर्मिती होते. देशात मोजक्याच ठिकाणी या पेपरची निर्मिती होते. त्यानुसार सुदर्शन पेपर मिलमध्ये या पेपरची निर्मिती होत विदेशात हा पेपर निर्यात होते. रविवार असल्याने दि. २८ रोजी कंपनी बंद होती. दरम्यान, सकाळी ११ वाजेच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. आग इतकी भिषण होती की, सर्व सामग्री जळून खाक झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या घटनेत कंपनीत तयार झालेला जवळपास ४५० टन ड्युप्लेक्स पेपरचा माल, कच्चामाल, यंत्र सामग्री आदी कोट्यवधीचे साहित्य जळून खाक झाले. आग इतकी भिषण होती की, दुरवरुन सुध्दा आगीचे लोळ दिसत होते.

आगीची घटना लक्षात येताच स्थानिक नागरीकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना तसेच अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेच्या, भुसावळ नगरपालिका अग्निशमन विभागाच्या पथकाने बंबासह घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. परंतू ही आग मोठी असल्याने दुपारपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

घटनेची माहीती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल पवार, पोहेकॉ. सुरज पाटील, गणेश गव्हाळे, जगदीश भोई यांच्यासह पथक, तलाठी जयश्री पाटील, सर्कल योगिता पाटील, महावितरणचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी भुसावळ, दीपनगर, जळगाव या ठिकाणाहून अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले होते. जळगाव मनपाचे अग्निशमन दलाचे कर्मचारी नासिर अली, राजू चौधरी, पन्नालाल सोनवणे, प्रकाश चव्हाण, विक्रांत घोडेस्वार, विजय पाटील यांच्यासह इतर कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.


 

 

Tags: #pepar milla aag newshttps://kesariraj.com/28-may-23-n-8/
Previous Post

अवैधपणे वाहतूक : म्हशीच्या ३० रेडकुंची पोलिसांनी केली सुटका

Next Post

भडगाव, चाळीसगाव, पाचोरा परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भडगाव, चाळीसगाव, पाचोरा परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon