जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मनिषा कॉलनीतील तरूणाची २० हजार रूपये किंमतीची सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी शनिवा रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनिषा कॉलनीत ललित सतिषचंद्र मणियार (वय-३५) हा तरूण खासगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवार २४ मे रोजी सकाळी १० वाजता ललितने त्याची सायकल ही घराच्या समोर असलेल्या भिंतीला पार्कींगला लावलेली होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची सायकल चोरून नेली. ललीतने सायकलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी २७ मे रोजी सकाळी १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.