पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होऊन चुरशीच्या निवडणुकीत मंगेश तांबे यांना यश आले त्यांचे परिवर्तन शेतकरी पॅनलला विकास सोसायटीत एकहाती सत्ता मिळाल्याने कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
अनेक वर्षापासून येथील विविध कार्यकारी सोसायटीवर एकतर्फी विजय मिळत होता. मात्र यावर्षी सत्ता परिवर्तन व्हावे , इतरांना संचालक म्हणून संधी मिळावी व विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जपले जावे , या भावनेतून मंगेश तांबे यांनी शेतकरी परिवर्तन पॅनलची स्थापना करूनयेथील विविध कार्यकारी सोसायटीत जुने संचालकांविरुद्ध नवे संचालक असा सामना उभा करत इतिहास नोंदला जाईल. अशी कामगिरी परिवर्तन शेतकरी पॅनलने केली तब्बल 11 जागांवर विजय मिळवत यश संपादन केले.
विजयी उमेदवारांमध्ये मंगेश सुधाकर तांबे, विनोद हिरामण खाडे, संजय विक्रम पाटील ,किसन लोटू महाजन, प्रवीण गोटूनाना बडगुजर, मुकुंदा भिका चौधरी, ताराचंद जंगलु महाजन, अशोक रघुनाथ चौधरी, मंगा हरी जावळे ,अरुण शेनपडु चौधरी ,प्रतिभा अशोक चौधरी, मिनाबाई गंगाराम महाजन तर भिकन धनजी भोई यांचा समावेश आहे
विजयी उमेदवारांचे जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.