जळगाव ( प्रतिनिधी ) – आज शिरसोली येथील जिजामाता विद्या प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगतराव बारकु पाटील यांचा 79 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि .प चे सेवानिवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी वाय .एन.ठोसरे होते प्रमुख पाहुणे म्हणून डी .टी .चौधरी ,जैस्वाल , आर .आर.पाटील ,चेअरमन प्रमोद पाटील , प्रकाश मिलवाणी होते यासोबतच परिसरातील जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसनिमित्त शिरसोली गावातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील इ 10 वी व 12वी मधून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शालेय विदयार्थ्यांना पुस्तके व वह्या वाटप करण्यात आल्या .प्रमुख पाहुणे व जगतराव पाटील यांच्या हस्ते व्रुक्षरोपण करण्यात आले सर्व विध्यार्थी व मान्यवरासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.