पारोळा ( प्रतिनिधी ) – शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज कृष्णा हॉस्पिटल येथे शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख हर्षल माने यांनी स्वस्त दरात कृषी पंप वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेना पारोळा तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, शिवसेना शहर प्रमुख अशोक मराठे, दिलीप चौधरी राजू पाटील, कल्पेश मराठे, दिपक शिंपी बाळु पाटील इत्यादी सन्माननीय मान्यवर उपस्थित होते. डॉ माने हा उपक्रम सलग 5 वर्षा पासून करत असून त्यांनी आता पर्यंत मतदार संघात तब्बल 15 ते 20 हजार कृषी पपं अल्प दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याने शेतकरी वर्ग त्यांना धन्यवाद देत आहे. शेतकरी वर्गास मदत हे समाजकारण असल्याचे डॉ. माने यांनी सांगून दि. 27 रोजी एरंडोल येथे शेकडो रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिल्याचे सांगितले.