चाळीसगाव (प्रतिनिधी) – राज्यसभेत झालेल्या नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीच्या वेळी, महाराष्ट्रातील राज्यसभेचे खासदार श्री उदयनराजे भोसले यांनी खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर जय हिंद ,जय महाराष्ट्र ,जय भवानी ,जय शिवाजी ,असा जयघोष केला म्हणून माननीय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या जयघोष केल्याबद्दल समज दिली व ही घोषणा रेकॉर्ड वरून काढून टाकण्यात येईल येईल अशा पद्धतीने सुचनाही दिली, माननीय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी तमाम महाराष्ट्रीयन व्यक्तीचे मन दुखावले आहे.
अशा त्यांच्या या कृतीमुळे महाराष्टाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याचा , निषेधाचे निवेदन चाळीसगाव कांग्रेसच्या वतीने चाळीसगाव येथील नायब तहसीलदार श्री विशाल सोनवणे यांना देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष अनिल निकम ,शहराध्यक्ष देवेंद्र पाटील ,सेवादल अध्यक्ष आर डी चौधरी माजी आमदार ईश्वर जाधव, अॅड वाडीलाल चव्हाण, अॅंड संदीप सोनार, नितीन सूर्यवंशी, पंकज शिरोळे रमेश शिंपी, प्रदीप देशमुख , मंगेश अग्रवाल ,सुनील राजपूत,आदी उपस्थित होते,