जळगाव (प्रतिनिधी) – युवाशक्ती फौंडेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन तर्फे 21 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त काव्यरत्नावली चौक जळगाव येथे सायंकाळी ६ वाजता युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली मेणबत्ती लावून व पुष्प अर्पण करून देण्यात आली.
दर वर्षी कारगिल विजय दिवसानिमित्त युवाशक्ती तर्फे युद्धात शहीद झालेल्या शूरवीरांच्या कुटुंबाला बोलवून प्रेरणादायी कार्यक्रम घेण्यात येत होते. या वर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, सदर कार्यक्रम रद्द करून फिझिकल डिस्टंसिन्ग चे पालन करून आदरांजली वाहण्यात आली.
या वेळी युवाशक्ती चे संस्थापक विराज कावडीया, आशा फौंडेशनचे गिरीश कुलकर्णी, प्रीतम शिंदे, अर्जुन भारुळे, पियुष तिवारी, उमाकांत जाधव, पंकज पाटील, भवानी अग्रवाल, सौरभ कुलकर्णी, मयूर जाधव, इत्यादी देशभक्त नागरिक उपस्थित होते.
या वेळी भारत माता की जय, शहिद अमर रहे या घोषणा देण्यात आल्या.