चुंचाळे ता.यावल (प्रतिनिधी) – मुंबई येथे बीएमसी त वाहन चालक पदावर कार्यरत असलेल्या चुंचाळे तालुका यावल येथील रहिवासी मिरखाँ नुरखाँ तडवी यांना जय संघर्ष वाहन चालक संस्थेतर्फे कोरोना महामारी च्या संकटकाळात रुग्णसेवेकरीता स्वताच्या जिवाची काही एक पर्वा न करता जनतेला रुग्ण सेवेचे कार्य करीत खर्या कोरोना योध्दा च निस्वार्थ कार्य केल्याबद्दल जय संघर्ष वाहन चालक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर , प्रविण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी कोरोना बचाव कार्यासाठी योगदान देणाऱ्यास कोरोना योध्दा सन्मान पत्र देऊन सन्मानित केले तसेच मिरखाँ तडवी हे आदिवासी तडवी भिल समाजाची हक्काची अँम्बुलन्स व्दारे ही अहोरात्र अथक परिश्रम घेत आरोग्य व रुग्ण सेवेचे कार्य अविरत करीत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्याना कोरोना योद्धा या सन्मान पत्राने सन्मानित करण्यात आले त्यांच्या या कौतुकास्पद कार्याचे चुंचाळे सह परिसरात कौतुक होत आहे त्यांचे जय संघर्ष वाहन चालक संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य ,तसेच आदिवासी तडवी भिल समाजातील त्रिमूर्ती फाऊंडेशन ग्रुप, तडवी भिल युवा कृती समिती, तडवी डॉक्टरफाऊंडेशन,आसेमं,आफ्रोट, तडवी द गाईड,तडवी फैजपुरियन्स ग्रुप, जळगांव जिल्हा समाज सेवक ग्रुप,सह समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या