भीमशंकर जमादार यांनी पदभार स्वीकारला

जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. भीमशंकर तुकाराम जमादार यांनी मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला गेली सव्वा महिने हे पद रिक्त होते.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांच्यावर जि. प. च्या सर्वसाधारण सभेने सव्वा वर्षपूर्वी अविश्वास ठराव पारित केल्यामुळे त्यांची रत्नागिरी येथे शासनाने बदली केली होती. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे हे पदभार सांभाळत होते. त्यामुळे शासनाने आता डॉ. भीमशंकर जमादार यांचे जळगावला सोलापूर येथून जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. दुपारी त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला.







