जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील परिपत्रकानुसार यापूर्वी नमूद तरतुदी शिथिल करण्यात आला आहेत. या परिपत्रकाच्या अधिन राहून दिनांक 25 ऑक्टोबर पासून जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रात व्यायामशाळा सुरु करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश यापुढेही लागू राहतील.असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.







