जळगाव ( प्रतिनिधी ) – उदासी बच्चीबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे उदासी डोळ्यांचा दवाखाना येथे सर्व गरजू जनतेसाठी मोफत कॉम्पुटर द्वारे डोळ्यांची व दाताची मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
डोळ्यांची तपासणी डॉ.एम.पी. उदासी करतील व दातांची तपासणी डॉ. विक्रम उदासी करतील तरी या शिबिराचा लाभ सर्व गरजू व्यक्तींनी घावा, असे आवाहन ट्रस्टचे संचालक डॉ.एम.पी. उदासी यांनी केले आहे.
शिबीर स्थान – उदासी डोळ्यांचा दवाखाना, सदोबा वेअर हाउस समोर, इच्छादेवी चौक येथे आयोजित करण्यात आले आहे. वेळ – २९ मे रविवारी सकाळी ९ ते 11 या वेळेत होईल.