चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील बस स्टॅन्ड समोर रोडवरील पत्राचे शेड का कापले असे विचारल्याच्या राग येऊन चाळीसगाव न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्याम छगनराव देशमुख यांच्यासह चौघांंनी महिलेला मारहाण करुन, तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी २६ रोजी घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरात ४० वर्षीय महिलेने चाळीसगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्याना, त्यांच्या मामीनी फोन करून सांगीतले की, श्याम छगनराव देशमुख हे कटरच्या सह्याने आपल्या हॉटेलचे मागील शेडचे पत्रे कापत आहेत. म्हणुन महिला ह्या तातडीने आई व मामासह घटनास्थळी पोहचल्या, त्या ठिकाणी श्याम देशमुख यांना महिलेने ‘पत्राचे शेड का कापले असे विचारले. त्याचा राग आल्याने त्यानी शिवीगाळ करुन महिलेचे दोन्ही हात धरुन तीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
तसेच महिलेच्या आईलादेखील श्याम देशमुख याने झटापटी करुन चापटा बुक्यांनी मारहाण केली आहे. तसेच सचिन देशमुख व त्याच्या सोबत चार अनोळखी इसमांनी महिलेचे मामा याना देखील घरात घुसून लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचेे फिर्यादीत म्हटले आहे. चाळीसगाव पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवरुन श्याम छगनराव देशमुख, सचिन देशमुख रा. वाल्मीक नगर, चाळीसगाव त्यांचे सोबत चार अनोळखी इसम यांचे विरुध्द गुन्हां दाखल करण्यात आला आहे.