जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्यात.
सुरुवातीला कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांनी पूजन केले. त्यानंतर शिक्षिका रुपाली आव्हाड यांनी स्वरचित कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली. सातवीच्या विद्यार्थ्यांनी “मी मराठी” या गीतावर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन त्यांना मराठी भाषेविषयी विविध प्रश्न विचारण्यात आले. मुलींनी पारंपरिक नऊवारी साडीचा पेहराव करून उपस्थिती दिली होती.
सूत्रसंचालन सुवर्णा अंभोरे यांनी केले. प्रसंगी मुख्याध्यापिका शीतल कोळी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.