कु-हा काकोडा, ता. मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – शासनाने राज्यात जिल्हा व आंतर जिल्हा वाहतुकीस परवानगी दिली असुन परिवहन महामंडळाच्या बसेस सुरु करण्यात आल्या असून कुऱ्हा गावांतील नागरिकांनी विविध कार्यक्रमाना जाणे टाळावे असे आवाहन कु-हा काकोडा येथील पोलीस पाटील विजय पाटील यांनी केले आहे .

आपले गावांतील नागरीक मोठ्या प्रमाणात परिवहन बसेस व खाजगी वाहनाने , बाहेर गांवी लग्न समारंभ, कुणी नातेवाईक आजारी असल्यास त्यास पहायला जाणे , इतर नातेवाईक मंडळीच्या भेटीला जाणे, कुणी नातेवाईक , मित्र परिवारातील व्यक्ती मयत झाल्यास त्याचे अंतीम संस्कारासाठी जातो किंवा मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी दारावर बसायला जातो मात्र आज रोजीची गावांतील परिस्थीती पाहता असे निदर्शनास येत आहे की, अश्या ठिकाणी संपर्क आल्यामुळे अनेक कुटुंब कोरोना विषाणूने बाधीत झाले आहेत .तर कुणाला आपले प्राण गमवावे लागले आहे.
तर कुणी दवाखान्यात जीवन मरणाच्या उंबरठ्यावर आहे .या करिता सर्व कुऱ्हा गावांतील नागरिकांनी आज मितीला अश्या कार्यक्रमाना व अशा ठिकाणी जाणे टाळा तसेच कुणी आले नाही म्हणुन रूसू नका .गैरसमज करून घेऊ नका मोबाईलद्वारे व सोशीयल मीडियाच्या माध्यमातुन ज्या परिवारात दुख:द घटना घडली आहे त्यांचे सांत्वन करा .ज्या परिवारात व कुटुंबात सुख दुखः यांची घटना घडली आहे त्यांनी ही समजून घ्या .राग मानू नका कारण जीव घेणा कोरोना विषाणू आपले गावापासून दुर आहे असे वाटत असताना तो आता आपले गावांत सर्वत्र पसरला आहे. तसेच कुणी व्यक्ती कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आले असतील किंवा काही त्रास होत असेल त्यांनी प्रा. आ. केंद्र कुऱ्हा येथे जाऊन तपासणी करून घ्यावी कोरोनाला घरात आणू नका आपली स्वतः ची व आपले कुटुंबाची काळजी घ्या .एकत्र येणे टाळा , मास्क वापरा कोरोना विषाणूची आपले गावांतील साखळी तोडण्यासाठी पुकारलेल्या बंदला व्यापारी बांधवाकडुन उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. परंतु अनेक नागरीक रुमाल व मास्क जवळ बाळगतात परंतु त्याचा वापर करत नसल्याचे जाणवले .सर्वानी घरा बाहेर पडताना मास्क लाऊनच जावे. तसेच विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे .घरी रहा सुरक्षीत रहा. वारंवार साबणाने हात धुत रहा ! शासनाचे आदेशानुसारच लग्न समारंभ व अंतीम संस्कार विधी पार पाडा , एक जागरूक नागरीक या नात्याने गांव कोरोना मुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करू या ! ! असेही विजय पाटील यांनी सांगितले.







