जळगाव (प्रतिनिधी) – काल धुळे येथे विध्यार्थी आंदोलकांवर झालेला हल्ला हा अत्यंत निंदनीय आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनार्थीना हुकुमशाहीने हुसकावणे हा सरकारचा जनरलडायर-तुघलकीपाणाच.. लाठीहल्ला, लाथाबुक्क्यांनी नाका तोंडातून रक्त येयीस्तव मारहाण ही सोशल मिडिया वरून समोर आली. जर संघटनेच्या प्रतीनिधींना मिडिया समोर बेदम मारहाण होत असेल तर सामान्य माणसांना न्याय कोण मिळवून देणार ? असे भा.ज.पा.शिक्षक आघाडीचे प्रवीण जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रत्यक्षात परीक्षेच्या निकालांचे पुनर्मुल्यांकन झाले पाहिजे. विध्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क परत करावे, अवास्तव शुल्काची मागणी करणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कारवाई व्हावी तसेच मार्च ते जून महिन्यातील वसतिगृह, मेस, बस चे शुल्क हे १००% परत करावे. शाळांनी महाविध्यालयांनी अभ्यास क्रमाप्रमाणे किमान ३०% शुल्क सरसकट माफ करावे आदी मागण्यांसाठी अ.भा.वि.पी. चे कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते ते काही गुंड नव्हते . खरंतर भा.ज.पा. शिक्षक आघाडी, जळगाव कडून सुध्दा आम्ही ५०% शैक्षणिक शुल्कात सुट मिळावी म्हणून मागणी आधीच केलेली आहे.
या आणि अशा मागण्यांचे निवेदन देण्यासाठी मा.पालकमंत्री यांची भेट मागितली होती. किमान मागण्या काय आहेत. या साठी मंत्री महोदयांनी विध्यार्थ्यांना भेटणे लोकशाहीत अपेक्षित होते. तसे न करता पोलिसांनी जोरझपट करून हल्ला चढवला पर्यायाने विध्यार्थी व पालकांच्या मागण्या जाणून न घेता आंदोलकांवर लाठी हल्ला करण्याचा सरकारचा हुकुमशाही चेहरा या निमित्ताने जनते समोर आला. आम्ही श्री.संजय वानखेडे, श्री.के.एस. पाटील, श्री.संजय घुगे, श्री. प्रवीण धनगर, श्री.किरण पाटील व पदाधिकारी भा.ज.पा.शिक्षक आघाडीकडून निषेध करतो.







