जळगाव (विशेष प्रतिनिधी) – मायक्रोसॉफ्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण आणि शिक्षक यासाठी कार्य करीत असते . विविध देशातील शिक्षक या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असतात . मायक्रोसॉफ्टच्या विविध तंत्रज्ञान विषयक कार्य करणार्या शिक्षकांचा गौरव मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर , व मायक्रोसॉफ्ट एक्सपर्ट अशा अवॉर्डने सन्मानित करते.अशा या आंतर्राष्ट्रीय स्तरावरील मायक्रोसॉफ्टच्या सन २०२०-२१ च्या अवॉर्डने जळगाव येथील राहुल चौधरी यांना सन्मानित करण्यात आले .
यासाठी त्यांना महेंद्र नेमाडे जळगाव व बी. बी. पाटील कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राहुल चौधरी यांच्या तंत्रस्नेही टिमच्या माध्यमातून पूर्ण जळगाव जिल्हा तंत्रस्नेही करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आजपर्यन्त त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव , शिक्षण विभाग जळगाव जिल्हा परिषद, रोटरी क्लब जळगाव , नॉलेज ब्रिज फौंडेशन अहमदनगर , शारिरीकशिक्षण तंत्रस्नेही पॅनल महाराष्ट्र , यांच्या सहकार्याने जळगाव तंत्रस्नेही टिमच्या माध्यमातून जळगाव जिल्हा तंत्रस्नेही करण्यासाठी भरीव असे कार्य केले आहे. व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा , एक्सेल कार्यशाळा , निकाल सॉफ्टवेयर कार्यशाळा ,विविध अॅप विषयी मार्गदर्शन कार्यशाळा , आणि कोरोंना काळातील विशेष बाब म्हणजे ऑनलाइन अध्यापन कसे करावे याविषयी ऑनलाइन अध्यापन वेबिनार ,कंटेंट निर्मिती कार्यशाळा आदि विविध बाबीचे आयोजन केले., आंतरराष्ट्रीय मायक्रोसॉफ्ट एक्सपर्ट अवॉर्ड ने त्याच्या या कार्याची पोच त्यांना मिळाली आहे..
या यशाबद्दल शकुंतला जे प्राथमिक विद्यालयचे अध्यक्ष शरददादा महाजन व दीपक सराफ यांनी कौतुक केले आहे. या कार्यासाठी त्यांना प्रेरणा व मार्गदर्शन करणारे सौ मंजूषा क्षीरसागर ,प्राचार्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव. श
बी जे पाटील शिक्षणाधीकारी माध्यमिक , देवीदास महाजन , बी एस अकलाडे शिक्षणाधिकारी प्राथमिक, डी. एम. देवांग , सतीश चौधरी, श्रीमती कल्पना चव्हाण, अनिल झोपे , प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार , किशोर वायकोळे , विजय पवार , रविकिरण बिर्हाडे , हाजी फिरोज पठाण, रागिणी चव्हाण, रोटरी क्लबचे श् जितेंद्र ढाके, डॉ.तुषार फिरके , पी. एम. जंगले, सी. डी. पाटील, प्रमोद आठवले, खाजगी प्राथमिक मित्र परिवार , व जळगाव तंत्रस्ंनेही शिक्षक टिम या सर्वांनी त्यांच्या या यशाबद्दल कौतुक केले.








