जळगाव ( प्रतिनिधी ) – पैसे दिले नाही म्हणून सासूला जावयाने शिवीगाळ करून मारहाण केली नशिराबाद पोलिस ठाण्यात जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ मन्यारखेडा गावात बालीबाई भारमल राठोड (वय-४२) कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांची मुलगी जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत संतोष बबलू पवार यांना दिली आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी जावई संतोष पवार सासु यांच्याकडे पैसे मागण्यासाठी आला होता. त्यावेळी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतोष पवार याने शिवीगाळ करून काठीने सासू बालीबाई राठोड यांना मारहाण करून पळून गेला. बालीबाई राठोड यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून जावई संतोष पवार यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे करीत आहेत.