पहूर ( प्रतिनिधी ) – बंद घराचे कुलूप तोडून ५० हजारांच्या नोटा व कागदपत्रे चोरीला गेली . पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला . .
जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे सुनिता सुरेश गायकवाड (वय-४५) कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २४ एप्रिलला रात्री ते २६ एप्रिलच्या सकाळ दरम्यान त्यांच्या गावातील गणेश उत्तम जाधव याने घरात कुणीही नसतांना प्रवेश करून घरातील ५० हजार रुपयांची रोकड आणि इतर कागदपत्रे चोरुन नेली सुनिता गायकवाड यांनी पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून पहूर पोलिस ठाण्यात संशयित गणेश जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल सुरवाडे करीत आहेत.