पाचोरा ( प्रतिनिधी ) – भगवान महावीर, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त खुल्या सामान्य-ज्ञान स्पर्धेचे आयोजन शिवसेना व युवासेना यांनी केले होते .या स्पर्धेचे बक्षीस वितरण व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्याचा सत्कार नुकताच राजीव गांधी टाऊन हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
अमोल चौधरी व विशाल पाटील यांची मुख्याधिकारीपदी निवड झाल्याबद्दल , गायत्री शिंपी यांची न्यायालयात वर्ग एक अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल , कुणाल सिनकर याची इंटेलिजन्स ऑफिसर तसेच बँक प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झाल्याबद्दल तर गौरव गोसावी यांची मार्केटिंग ऑफिसरपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ.भरत पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
बक्षीस वितरण आमदार किशोर पाटील यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार कैलास चावडे, पो नि किसनराव नजन पाटील, बिलोली येथील मुख्याधिकारी अमोल चौधरी , सौ प्रतिभा चावडे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील , राजेंद्र पाटील , डॉ भरत पाटील, जितेंद्र जैन, शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर ,सौ मंदा पाटील , प्रवीण ब्राम्हणे, गजु पाटील , अनिकेत सूर्यवंशी, जितेंद्र पेंढारकर उपस्थित होते .
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी केंद्रीय व राज्य पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांची माहिती दिली व केंद्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन करिअरचे शिखर गाठावे. परिश्रम व चिकाटीच्या जोरावर आपल्या क्षमता ओळखाव्या , असे सांगितले
प्रास्ताविक प्रवीण ब्राह्मणे यांनी केले .सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्याना प्रमाणपत्र व प्रा.राजेंद्र चिंचोले लिखित “स्पर्धा परीक्षा सारथी”हे पुस्तक आमदार किशोर पाटील यांच्याकडून भेट देण्यात आले
सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेते – प्रथम – भैय्या शरीफ निंबोळे ( रुपये 5001 ) , द्वितीय – योगेश राठोड व ईश्वर चौधरी (प्रत्येकी रुपये 2501) , तृतीय तन्मय शिंदे ( रुपये 2001 ) , उत्तेजनार्थ – अभिषेक पाटील व ऋत्विक पाटील प्रत्येकी ( 1001 ) , मुलींमधून प्रथम:- युगंधरा पाटील ( रुपये 501 ) , सर्वात कमी वयाचा स्पर्धक: गीतार्थ राऊळ ( रुपये 501 ) . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले .आभार प्रदर्शन गजु पाटील यांनी केले .परीक्षकांचा सत्कार करण्यात आला.