जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील कंजारवाडा भागातील जाखणीनगरातील सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी काल रात्री धाड टाकली मात्र पोलिसांना पाहून आरोपी फरार झाले . पोलिसांनी जुगाराचे साहित्य जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
पो कॉ गोविंदा पाटील यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की , काल रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांच्यासह सफौ आनंदसिंग पाटील, पोहेको जितेंन्द्र राजपुत, पोना गणेश शिरसाळे , विकास सातदिवे, मपोकों भारती देशमुख यांना पो नि प्रताप शिकारे यांनी सूचना दिली की, जळगाव शहरात जाखनीनगर भागात पवन भाट ( रा. जाखणीनगर ) हा त्यांच्या घरामसोर काही लोकांनाकडुन मिलन व मेन बाजार सटटा जुगाराचे आकडे पैशे स्विकारून खेळवित आहे पोना. गणेश शिरसाळे यांनी दोन पंचाना बोलावुन हे पथक खाजगी वाहनाने जाखनीनगर ( कंजरवाडा जळगांव ) येथे गेले बातमीची खात्री केल्यावर पवन भाट हा त्यांचा घरासमोर पैसे व आकडे स्विकारतांना दिसला पोलीसांना पाहुन पवन भाट व काही लोक गल्ली बोळातून पळत सुटले त्यांचा पाठलाग पोलिसांनी केला मात्र हे संशयित फरार झाले पोलिसांनी तेथून 170 रुपये रोख , मिलन व मेन बाजार सटटा जुगाराचे आकडे व पैशे लिहीलेल्या दोन पाने जप्त केली पवन भाट व त्याच्या साथीदारांविरोधात मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .