जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर शहरातील महावीर नगरातील एका घरातून दोन मोबाईल आज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हेमंत शांताराम वाणी ( वय – ४८) रा. महावीर मार्ग, जामनेर हे हॉटेल व्यवसायिक आहे. बुधवार २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते ८.३० दरम्यान त्यांच्या घरात असलेल ४५ हजाराचे दोन मोबाईल आज्ञात चोरट्याने चोरून नेले. त्यांनी घरात सर्वत्र मोबाईलचा शोध घेतलाअसता, मोबाईल कुठेही मिळून न आल्याने त्यांनी जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल साहिल तडवी करीत आहे.