नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून आज देशवासीयांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच कारगिल विजय दिनाचे स्मरण करून शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना त्यांनी, ‘आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा असून, २१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय लष्करानं विजयाचा झेंडा फडकावला होता. कारगिल युद्ध ज्या परिस्थितीमध्ये झालं, ते भारत कधीही विसरू शकत नाही,’ असे सांगत शहिदांच्या शौर्याला अभिवादन केले.
‘२१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय लष्कराने विजयाचा झेंडा फडकावला होता. कारगिल युद्ध ज्या परिस्थितीमध्ये झाले, ते भारत कधीही विसरू शकत नाही. पाकिस्ताननं मोठंमोठं मनसुबे ठेवून भारताच्या भूमीवर कब्जा करण्यासाठी आणि स्वतःच्या देशातील अंतर्गत कलहांवरून लक्ष हटवण्यासाठी हे धाडस केलं होतं. भारत त्यावेळी पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून प्रयत्न करत होता.
आज कारगील विजय दिवस. कारगील विजयाला आज 20 वर्ष पूर्ण झाली. एकीकडे सध्या देशात चीनविरोधी वातावरण असताना आपण 26 कारगिल विजय दिवस साजरा करतोय. 1999 मध्ये पाकिस्तानच्या कुटिल मनसुब्यांवर मात करत त्यांना रणभूमीवर भारतीय सैन्याने धूळ चारली होती.







