चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यातील नलंगी येथील तरूणाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सावत्र मुलाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.
सहाबाई शिवराम बारेला (वय – ४५, गलंगी, ता.चोपडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दीपक मगन बारेला ( वय – २५ ) असे संशयित तरूणाचे नाव आहे. मयत महिला ही संशयित आरोपीची सावत्र आई आहे. दीपक बारेला हा सावत्रआई सहाबाई बारेला यांच्यासोबत राहतो. सावत्रआईच्या ही चांगली वागणूक देत नसल्याने दिपक कंटाळला होता. त्यामुळे रविवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री दोघांमध्ये वाद झाला होता. या वादात संतापाच्या भरात दिपकने सावत्रआईच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळल्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक अमर वसावे व सहकार्यांनी घटनास्थळी जाऊन घटना जाणून घेतली. संशयीत सावत्र मुलाला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या घटनेबाबत अद्याप पेालीसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.