जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गणपती नगर येथील ‘जी. एच. रायसोनी वंडर किड्स’मधील प्ले ग्रुप,नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पपेट शो’चे सादरीकरण करण्यात आले. जी. एच. रायसोनी वंडर किड्सच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा व त्यांचे सहकारी शिक्षक वर्ग कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित होते. या संदर्भात माहिती देताना मुख्याध्यापिका तेजल ओझा म्हणाल्या की, विध्यार्थ्यासाठी खूप छान आणि वेगळे कथाकथन सत्र आयोजित करीत असून, विद्यार्थ्यांना कथा अशा प्रकारे जाणवेल की त्यांच्यासमोर कथेतील पात्रे खरी असतील. मुलांच्या ज्ञानात वाढ होण्याबरोबरच या चिमुकल्यांसाठीही याचा खूप फायदा होईल तसेच अभ्यासासोबतच मुलांची कल्पनाशक्ती वाढावी आणि कथेच्या माध्यमातून चांगले शिक्षण देणे हा वंडर किड्सच्या वतीने पपेट शो व कथा सांगण्याचे सत्र आयोजित करण्याचा मुख्य उद्देश आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या पपेट शोमधून ससा-कासवाची गोष्ट, कोल्हा व द्राक्ष्यांची गोष्ट यासारख्या विविध अभ्यासक्रमातील गोष्टी अभिनव पद्धतीने पपेट शोच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या. यावेळी पूर्व प्राथमिकच्या विध्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पपेटमधील हलती चित्र बघून मुलं खूपच खूश होती. सादर होणाऱ्या गोष्टीमध्ये रममाण झाली होती. या पपेट शोला विध्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पपेट शोच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या शिक्षिका नेहा चिंचोले, मयुरी वालेचा, आरती पाटील, निधी खडके, रिंकू लुल्ला, सोनिया शर्मा, नेहा शिंपी, दिपाली कुलकर्णी आदींसह स्कूल कमिटी सदस्य यांचे मागदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व ‘जी. एच. रायसोनी वंडर किड्सच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.