संविधानामुळे सशक्त लोकशाही प्राचार्य डॉ. किशोर पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव ( प्रतिनिधी ) – 26 नोव्हेंबर संविधान दिन राष्ट्रीय सेवा योजना विभाग कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव तर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाटील हे होते त्यांनी आपल्या मनातून संविधानामुळे आपली लोकशाही कशी बळकट झालेली आहे याचे मुद्देसूद विश्लेषण करून संविधान दिनाचे महत्त्व पटवून दिले. प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. अभिजीत जोशी यांनी संविधानामुळे नागरिकांना मिळालेले कायदे स्वातंत्र्य याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरुण वळवी, डॉ. संजय शिंगाणे चोपडा विभागीय समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरव महाजन आभार डॉ.ज्योती महाजन यांनी मानले, याप्रसंगी नॅक कॉर्डिनेटर प्रा. संदीप पालखे, प्रा.राजू केंद्रे,डॉ. वारडे डॉ.खरे, डॉ. गायकवाड हे उपस्थित होते, डॉ. कांचन महाजन, श्री. दिलीप चव्हाण, श्री तोडे, श्री. जितू परदेशी, श्री परेश पाटील शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक यांची उपस्थिती लाभली.