धरणगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंप्री गावाजवळ आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज २६ रोजी घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस घटनेची माहिती घेत आहे.
धरणगाव तालुक्यातील पिंप्रीजवळ मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाला आयशर क्र. एम.एच.१८.बी.झेड.०६२२ याने जोरदार धडक दिली. यामुळे रस्त्यावरच तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी धरणगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्यासह खुशाल पाटील, दीपक पाटील, समाधान भागवत यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट दिली.
अपघातग्रस्त आयशर वाहन पोलीस स्थानकात जमा करण्यात आले आहे. या तरुणाचा मृतदेह धरणगाव रूग्णालयात आणण्यात आला आहे. हा तरुण धरणगाव तालुक्यातील वाघळूद गावातील गजानन पाटील(४३) असल्याची माहिती मिळत आहे. धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते.