जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरातील एका विद्यार्थीनीच्या मोबाईलच्या व्हॉटसॲपवर अनोळखी व्यक्तीने अश्लिल मेसेज पाठविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात २१ तरुणी वास्तव्यास असून ती शिक्षण घेत आहे. २२ जून ते २५ जून दरम्यान तरुणीच्या मोबाईलवरील व्हॉटस्ॲपवर अनोळखी व्यक्तीने अश्लिल संदेश तसेच अश्लिल छायाचित्र पाठविले. याबाबत तरुणीने शनिवारी अश्लिल मेसेज पाठविणाऱ्या ८७६७६८७४७९ या मोबाईल क्रमांकाच्या अनोळखी व्यक्तीविरोधात सायबर पोलिसात तक्रार दिली असून त्याच्याविरोधात आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे