जळगाव (प्रतिनिधी) – येथील काबरा हॉस्पिटलतर्फे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त दोनदिवसीय मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या शरीराची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
शिबीर रविवारी ३० एप्रिल व १ मे रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात ईसीजी, शुगर, बीपी, कावीळ, चरबीचे प्रमाण, ऑक्सिजन पातळी, फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासणी करण्यात येईल. तसेच युरिक ऍसिड, किडनी, हिमोग्लोबिन, थॉयरॉईड, कोलेस्टेरॉल तपासणी सवलतीत तपासल्या जातील.
वेळीच तपासणी केल्यास वेळीच रोगनिदान होऊन लवकर उपचार करता येतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या शरीराची वेळीच तपासणी करून घ्यावी, शिबिरासाठी प्रभात चौकातील शानभाग हॉलमागील काबरा रुग्णालयात यावे, अशी माहिती डॉ. प्रफ्फुल्ल काबरा यांनी दिली आहे.