मुंबई (वृत्तसंस्था) – शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. ध्यानीमनी नसतानाही मी मुख्यमंत्री झालो, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले आहे.

मुख्यमंत्री पदासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, आतासुद्धा हा एक विचित्र योगायोग आहे. पण ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी खांद्यावर आली. जागतिक आरोग्यविषयक आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे अशा वेळी ही जबाबदारी मिळाली. त्यातून आता आपण बाहेर जात असून हा कठीण काळ आहे. संकट कोणतेही असले तरी त्याच्या खोलात जाणे फार महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘मिशन बिगिन अगेन.’ अर्थात ‘पुनःश्च हरिओम’ हा नारा देत राज्यामधील लॉकडाउनचे नियम शिथिल करत असल्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर पुन्हा जुलै महिन्यापासून राज्यातील अनेक शहरांमध्ये टप्प्या टप्यात लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र अशाप्रकारे केवळ आपल्यालाच पुन्हा लॉकडाउन करावा लागत नसून लॉकडाउन करताना जतनेच्या आरोग्याचा तसेच अर्थव्यवस्थेचा एकाच वेळी विचार करणे गरजेचे असते असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.







