गुढे.ता.भडगांव(प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या बोरखेडा(पिराचे), ता.चाळीसगाव येथील रहिवासी चाळीसगाव एस.टी.डेपोत वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले विजय रामराव पाटील (वय ४७) या तरुण कोरोना योध्दयाचा नुकताच.२३रोजी सकाळी ३:३५वा.कोरोना पाँझिटिव्हमुळे मृत्यू झाला ते घरातील ऐकमेव कर्ता पुरुष मृत्यू होते त्यांच्या मृत्यूने गाव परिसर व एसटी डेपो परिवारामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.चाळीसगाव एस.टी डेपोत वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले विजय पाटील यांनी लाँकडाऊन नंतर सेवेत रुजू झाल्याने त्यांनी दि.२७आँगस्टला मालेगांव व दि.२८रोजी औरंगाबाद येथे डयुटी केलेली होती.दुदैवाने त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना ७ सप्टेंबरला चाळीसगाव येथील महात्मा फुले शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या टेस्ट पाँझिटिव्ह आली होती.तेथे जागेअभावी अँडमिट करता आले नाही म्हणून पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील खाजगी दवाखान्यात अँडमिट केले येथे तीन दिवस उपचार केले पण तब्बेतीत सुधारणा न दिसल्याने त्यांना लगेच१० रोजी धुळे येथील भाऊसाहेब हिरे मेडिकल काँलेज येथील कोवीड सेंटरला कोरोनाचा उपचारासाठी दाखल केले व तेथे उपचारादरम्यान त्यांचे दि.२३रोजी सकाळी३:३५ वा कोरोना पाँझिटिव्हमुळेच दुदैवाने निधन झाले. धुळे येथे शासकीय नियमानुसार त्यांच्यावर तेथे अत्यंसंस्कार करण्यात आला.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन लहान मुले,वृद्ध आई-वडील असा परिवार असून ते घरातील ऐकमेव कर्ता पुरुष होते.ते गेल्याने या कुंटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
विजय पाटील महा.राज्य परिवहन महामंडळाच्या चाळीसगाव एस.टी.डेपोत चालक म्हणून सेवत कार्यरत होते.सेवेत असतानाच त्यांना दुदैवाने कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान कोवीड पाँझिटिव्ह ने मृत्यू झाल्याने त्यांना कोरोना योध्दा म्हणून शासनाने घोषित करून त्यांंच्या परिवाराला शासकीय मदत मिळावी अशी मागणी त्यांच्या परिवाराने केली आहे.