जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातुन दोन वर्षांसाठी हद्दपार असतांना जळगाव शहरात वास्तव्यास असलेल्या संशयित आरोपी गौरव भरत कुंवर (वय-२३) रा. जळगाव या स एमआयडीसी पोलीसांनी राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात हद्दपारीचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की , शहरातून दोन वर्षाकरीता हद्दपार असलेला संशयित आरोपी गौरव भरत कुंवर (वय-२३) रा. सप्तश्रृंगी मंदिराजवळ जळगाव हा जळगावात आला असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांनी मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, पो.ना. मुदस्सर काझी, हेमंत कळसकर , पोकॉ. सचिन पाटील आणि पोकॉ चंद्रकांत बळीराम पाटील यांनी कारवाई करत गुरुवारी मध्यरात्री १ वाजता घरी जावून घराच्या बाहेर बसलेल्या संशयित गौरव कुंवर याला अटक केली. दरम्यान त्याला जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेले असतांना कोणतीही परवानगी घेतली नसल्याने एमआयडीसी पोलीसांनी त्याला अटक केली. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या हद्दपारीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.