बोदवड (प्रतिनिधी) – तालुक्यातील विचवे येथील महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमूख तथा आमदार चंद्रकांत पाटिल यांची मुक्ताईनगर येथील निवास स्थानी भेट घेत गावातील ऊद्भवलेल्या समस्यांविषयी चर्चा केली. मुलभूत समस्या तात्काळ निकाली काढण्याचा शब्द आमदार चंद्रकांत पाटिल यांनी दिल्यामूळे विचवे येथील महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शारदाबाई होंडाळे, सीमाबाई पाटील,शांताबाई पाटील,शोभाबाई कुंभार, कमलबाई नेहते,अंजनाबाई होंडाळे,सुनिताबाई धिम्मत, वंदनाबाई तायडे,पार्वताबाई पाटील,सुभाबाई होंडाळे,शोभाबाई काळे, जिजाबाई तायडे,विमलबाई नेहते,सुशिलाबाई पाटिल, देवकाबाई काळे,सोनी सुरवाडे, लिलाबाई काळे,सुजिताबाई कुंभार,रजनीबाई नेहते, सुपडाबाई होंडाळे,फकीरा पाटिल,बाबू होंडाळे,मोहन धिम्मत,विजय पाटिल,किरन तायडे,भगवान कजगोडे अश्या २० महिला व ६ जणांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका कल्पनाताई पालवे , उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाठ,तालूका संघटक शोभाताई कोळी,शहर संघटक सरिताताई कोळी,शाखा संघटक ज्योती मालचे,कामिनीताई गवते, मंगलाताई धनगर,संनदाबाई खिरवडकर,अबिदा पिंजारी, सुरेखाबाई कोळी,हसीना तडवी, लता ठाकरे यांच्यासमवेत स्वीय सहायक प्रवीण चौधरी , तालुकाप्रमुख छोटू भोई,माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे , विधानसभा क्षेत्र प्रमूख सुनिल पाटिल,युवा सेना तालुका प्रमुख पंकज राणे,शहर प्रमुख प्रशांत टोंगे,हारुन शेख,सुनिल गवते, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासमवेत कार्यकर्ते उपस्थित होते.







