चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग, IQAC आणि भारत सरकारची ग्राहक मार्गदर्शन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “Consumerism & Financial Literacy in Covid-19 Times” या विषयावर महाविद्यालयातील पदवी स्थरावरील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला. वेबिनारचे प्रास्ताविक IQAC चे समन्वयक उप-प्राचार्य प्रा.अजय व्ही. काटे यांनी केले.संबंधित वेबिनार दोन भागात विभागला गेला होता.
त्यातील पहिल्या भागात माननीय टी.आर. पांडे (प्रकल्प व्यवस्थापक,CGSI) यांनी “उपभोक्तावाद” या विषयावर बोलतांना म्हटले कि, ग्राहकांची फसवणूक कशी केली जाते व त्यापासून वाचण्यासाठी कोठे तक्रार करावी? याविषयावर मार्गदर्शन केले. वेबिनारच्या दुसर्या भागात माननीय नंदकुमार मेनन (वित्तीय सल्लागार, CGSI) यांनी “वित्तीय साक्षरता” या विषयावर बोलतांना गुंतवणूक कशी करावी व त्यातून दीर्घकालीन महत्तम फायदा कसा मिळवावा, यावर मार्गदर्शन केले. वेबिनारचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद व्ही.बिल्दीकर यांनी आपल्या मनोगतात फसव्या जाहिराती कशा असतात व ग्राहकांनी त्यापासून स्वत:ची फसवणूक कशी टाळावी, याविषयावर मार्गदर्शन केले. या वेबिनारसाठी 110 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अर्थशास्त्र विभाग प्रमुख व वेबिनार समन्वयक प्रा.शशिकांत डी. भामरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. वेबिनारच्या यशस्वीतेसाठी नळेगाव महाविद्यालय (जि.लातूर) येथील प्रा.अमोल अ. पगार, प्रा.प्रभाकर व्हि.पगार, प्रा.अंकुश आर. जाधव, आणि प्रा.दिपक बी. पाटील यांनी परिश्रम घेतले.