कासोदा ता , एरंडोल ( प्रतिनिधी) – एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील पीर परदेशी बाबा यांच्या उरुसानिमित्त दि. 27 नोव्हेंबर शुक्रवार रोजी संदल मिरवणूक निघणार होती ती रद्द करण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे या अनुषंगाने संदल मिरवणूक रद्द करण्यात आली आहे असे दर्गा चे अध्यक्ष सुलेमान शेठ खाटीक व सदस्य रियाजुद्दीन मुल्लाजी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.







